शुक्रवार, 25 एप्रिल 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2011 (15:48 IST)

हरेन पांड्या हत्याकांडात सर्व आरोपी मुक्त

गुजरात उच्च न्यायालयाने हरेन पांड्या हत्याकांडातील सर्व १२ जणांना हत्येच्या आरोपातून मुक्त करताना सीबीआयला फटकारले आहे. मात्र हत्येचा प्रयत्न आणि आपराधिक कारस्थान रचण्याच्या आरोपात दोषी ठरवले आहे.

न्यायमूर्ती डी एच वाघेला आणि न्यायमूर्ती जे सी उपाध्याय यांच्या खंडपीठाने उभयंतांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. न्यायालयाने आरोपींविरूद्धचे भारतीय दंड सहितेनुसार कलम ३०२ अंतर्गत लावण्यात आलेला हत्येचा आरोप खारीज करताना हत्येच्या प्रयत्नासाठी कलम ३०७ आणि आपराधिक कारस्था रचण्यासाठी १२० अंतर्गत आरोप निश्चित केले.

२००७ मध्ये दहशतवाद विरोधी कायदा पोटा च्या विशेष न्यायालयाने या सर्वांना हत्येसाठी दोषी ठरवले होते. गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांची २६ मार्च २००३ मध्ये सकाळी गार्डनमध्ये फिरताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.