Durga Ashtami 2026 Wishes in Marathi दुर्गा अष्टमी शुभेच्छा संदेश
"उदे गं अंबे उदे...!"
दुर्गा अष्टमीच्या निमित्ताने
आई तुळजाभवानी आणि माता दुर्गेची कृपादृष्टी
आपल्या व कुटुंबावर सदैव राहो
शुभ दुर्गा अष्टमी!
"नारी तू नारायणी, नारी तू सबला,
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला!"
महाअष्टमीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा
आई दुर्गेच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होवो,
आपल्याला शौर्य, आनंद आणि ऐश्वर्य प्राप्त होवो
दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
माता दुर्गेच्या चरणी प्रार्थना,
आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करोत
शुभ दुर्गा अष्टमी!
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥
दुर्गा अष्टमीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
श्री दुर्गा मातेच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, शांती आणि समाधान लाभो
दुर्गा अष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
साडेतीन पीठांची शक्ती, नवरात्रीचा हा पावन काळ;
दुर्गा मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना
दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
महाअष्टमीच्या या पावन प्रसंगी दुर्गेची कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो
हसत राहा, समृद्ध व्हा!
दुर्गा अष्टमीच्या शुभेच्छा
वाईटावर चांगल्याची मात, संकटांचा होवो नाश;
दुर्गा अष्टमीच्या या शुभ दिवशी
तुमच्या आयुष्यात येवो आनंदाचा प्रकाश
महाअष्टमीच्या शुभेच्छा!
सर्व दुःखांचा नाश करो नवदुर्गा,
आयुष्यात आणो सुखाची बहार
दुर्गा अष्टमीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
दुर्गा मातेचे रूप तेजस्वी, कृपा तिचा अपरंपार;
या महाअष्टमीच्या दिवशी होवो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण
दुर्गा अष्टमीच्या शुभेच्छा!
भक्ती, शक्ती आणि मुक्तीचा हा सण;
दुर्गा अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर तुमचे जीवन उजळून निघो
महाअष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
अंबे मातेचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर सदैव राहो,
तुमच्या घरात सुख-समृद्धीची बरसात होवो
दुर्गा अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!
देवी दुर्गेची अथांग कृपा तुमच्या पाठीशी राहो
आणि तुमचे जीवन यश, कीर्ती व आनंदाने भरून जावो
दुर्गा अष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

