शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नवरात्रीत अखंड ज्योत लावण्यामागे हे आहे कारण

नवरात्रीत देवीची कृपा मिळवण्यासाठी अखंड ज्योत लावली जाते. ज्या घरात नवरात्रीत अखंड ज्योत जळते त्या घरात नकारात्मकता येत नाही. 
 
तसेच अखंड दिवा लावल्याने शनीचा कुप्रभाव कमी होतो. कामात येत असलेले अडथळे आपोआप दूर होतात. शनि दोष असेल अश्या घरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. ज्याचा अधिक प्रभाव पडतो आणि शनी शुभ फल देतं.
 
तसेच आपल्याला घरात सकारात्मक वातावरण हवं असल्यास शुद्ध तुपाचा दिवा लावावा. याने घरातील आजार दूर पळतात. वाद- भांडण, मानसिक ताणापासून मुक्ती मिळते.
 
शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील अखंड ज्योतीचे फायदे आहेत. अभ्यासात चांगले परिणाम मिळावे यासाठी विद्यार्थ्यांने दिव्यात तुपाची भर घालावी. नियमित पूजा करावी तर स्मरण शक्ती वाढेल आणि अभ्यासात ही मन रमेल.
 
याचे वैज्ञानिक फायदे बघायला गेलो तर घरात तुपाचा अखंड दिवा लावल्याने श्वास आणि नर्व्हस सिस्टमवर प्रभाव पडतो आणि दिव्यात किंवा यासोबत सकाळ-संध्याकाळ कापूर जाळल्याने बॅक्टेरिया मरतात आणि फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरतं. कापूरच्या सुगंधाने चित्त शांत राहतं आणि घरात सुखद वातावरण निर्मित होतं.