1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
  4. Mahanavami 2026 Wishes in Marathi

Mahanavami 2026 Wishes in Marathi महानवमी शुभेच्छा संदेश मराठी

माँ दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या 
सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळो
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 
महानवमीच्या खूप खूप शुभेच्छा!
 
या महानवमीच्या पवित्र दिवशी, 
तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत 
आणि आई दुर्गेची कृपा तुमच्यावर 
व कुटुंबावर सदैव राहो
शुभ महानवमी!
 
देवी दुर्गेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात 
सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो
महानवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
तेज तुझे उजळू दे हे जग सारे, 
दूर होवो सर्व अंधार आणि दुःख सारे... 
महानवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
नवरात्रीचा नववा दिवस, 
शक्ती आणि भक्तीचा संगम! 
जगदंबेची कृपा तुमच्यावर 
आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो
महानवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। 
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते॥ 
महानवमीच्या पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला आदिशक्ती भवानी 
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो 
आणि तुमच्या कार्यात यश देवो
महानवमीच्या शुभेच्छा!
 
दुष्ट शक्तींचा नाश करून सत्याचा विजय घडवणाऱ्या 
जगदंबेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो
महानवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
सकारात्मकतेचा प्रकाश आणि देवी आईचा आशीर्वाद 
तुमच्या आयुष्यात सदैव राहो
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला 
महानवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
शक्ती, भक्ती आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या 
महानवमीच्या दिवशी तुमच्या सर्व अडचणी दूर होवोत हीच प्रार्थना
शुभ महानवमी!
 
अष्टभुजा देवी माँ दुर्गा तुमच्या आयुष्यातील 
सर्व संकटांचे हरण करो आणि यशाचे नवीन मार्ग उघडो
महानवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
पुढील लेख
पांडे गावचे 'उभ्याचे नवरात्र': ३५० वर्षांची अतिशय खडतर आणि अद्वितीय धार्मिक परंपरा