शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : मंगळवार, 12 जानेवारी 2021 (16:34 IST)

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय १

श्रीगणेशायनमः ॥ अथतुरजामहात्म्यप्रारंभं ॥ जयपरमात्मयागजानना ॥ विघ्नांतकागौरीनंदना ॥ लंबोदरानागभूषणा ॥ नमितोंतुझ्याचरणासी ॥१॥
तूंपरमात्मापरमेश्वर ॥ तुझे अंशजीव अपार ॥ त्याचें अज्ञानकरसीदूर ॥ अतिसत्वरभजताची ॥ २॥
सुलभपूजेसीदुर्वांकुर ॥ घेऊनीवैभवदेसीअपार ॥ ऐसादयाळतूंथोर ॥ कितीमीपामरतुजवाणुं ॥३॥
शरीरेसाष्टांगनमन ॥ मुख्नामौच्चारून ॥ हृदयींकरुनीतुझेंध्यान ॥ एकवरदानमागतों ॥४॥
श्रीजगदंबेचेंचरित्र ॥ व्यासोक्तजें अतिपवित्र ॥ देश भाषेंतविचित्र ॥ प्रगटकरीमममुखें ॥५॥
ऐसागणेशरूपीईश्वर ॥ स्तविलात्याचेर्चारूपांतर ॥ कार्यरंभीस्मरतीं थोर ॥ मंगलवृद्दीहोतसे ॥६॥
ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥ सूर्यचंद्रधराकुमर ॥ बुधगुरुशुक्रशनैश्वर ॥ राहु केतुइंद्रनमियले ॥७॥
वाग्देवतारपरमेश्वरी ॥ नमोब्रह्मीमाहेश्वरी ॥ कौमारवैष्णवीसुंदरी ॥ सपरिवारीनमियेल्या ॥८॥
वाराहिंद्राणीचामुंडेश्वरी ॥ स्वामीकार्तीकसपरिवारी ॥ क्षेत्रपालसंकटहारी ॥ ग्रंथारंभींनमियले ॥९॥
देवऋषीपितृगण ॥ सिद्धमुनीकविब्राह्मण ॥ गुरुसंतश्रोतेसज्जन ॥ ग्रंथारंभीनमियले ॥१०॥
श्रोतेहोऐकासावधान ॥ शिवपुत्रजोषडानन ॥ तेणेंतारकासुरमारून ॥ देव सर्वहीसुखीकेले ॥११॥
ऐसाजोस्वामीकार्तिक ॥ महानयोगप्रवर्तक ॥ त्याचेदर्शनासकळीक ॥ ऋषी थोरथोरपातले ॥१२॥
सकळींकेलानमस्कार ॥ विनवितीजोडोनीकर ॥ म्हणतीदर्शनाचा लाभथोर ॥ आम्हासझालाआजहा ॥१३॥
तूंतरीसर्वज्ञानसागर ॥ तुझेंरूपाल्हादकर ॥ तुशंकरासी प्रियकर ॥ भक्तरक्षकसमर्थतूं ॥१४॥
आम्हीतुझेप्रसादेकरून ॥ इतिहासपुराणेसंपुर्ण ॥ ऐकिलेपरितृप्तीजाण ॥ नाहींझाले अद्यापि ॥१५॥
सुधारससेविताअमरासी ॥ काबहुवनजोडिलालोभियासी ॥ समाधीसुख योगियासी ॥ पुरेनम्हणवेज्यापुरी ॥१६॥
तैसेत्वांआम्हाप्रत ॥ कथिलिंत्वरीतादेवी अद्‍भुत ॥ तिचेच नामतुळजाविख्यात ॥ किमर्थझालेतेंसांग ॥१७॥
किमर्थयमुनापार्वतीं ॥ प्रगटलीस्वयंज्योती ॥ जगदाधाराव्यक्तमूर्ती ॥ सच्चिदानंदकेवळ ॥१८॥
निराकार आकारलं ॥ साकाराष्टभुजशोभले ॥ स्त्रीवेषेलावण्यभले ॥ सुलभझालेभक्तांसी ॥१९॥
सांगसविस्तरतिचेंचरित्र ॥ पवित्रकरीआमुचेश्रोत्र ॥ संतोषलाउमापुत्र ॥ प्रश्नाऐकोनऋषीचा ॥२०॥
स्कंदम्हणेहोतुम्हीसादर ॥ ऐकात्वरितादेवीचरित्र ॥ कैलासपर्वतीपंचवक्र ॥ उमेसहितशोभत ॥२१॥
तेथेंब्रह्मऋषिएक ॥ वरिष्ठनामाआलादेख ॥ नमस्कार करोनीसन्मुख ॥ हातजोडुनीबोलला ॥२२॥
देवाधिदेवाजगन्नायका ॥ तुझाच आधारसकळलोकां ॥ गिरिजारमणाविश्वरक्षका ॥ विनंतिएकपरिसावी ॥२३॥
भक्तिनेमीपुसतोएक ॥ त्वरीतादेविचेंकथा नक ॥ तुलजादेवीहीम्हणतीलोक ॥ किर्तनकरितीसर्वदा ॥२४॥
किमर्थझालासेअवतार ॥ किमर्थ तुलजानामगजर ॥ हेचिऐकावयाथोर ॥ उत्कांठामजलागली ॥२५॥
ऐकोनिम्हणतीसदाशिव ॥ धन्यब्राह्मणातुझाभाव ॥ त्वरितादेवीचेंवैभव ॥ सांगेनाऐकसद्भावें ॥२६॥
तरीपूर्वींकॄतयुगांत कर्दम नामोद्विजविख्यात ॥ वेदशास्त्रपारंगत ॥ स्वधर्मनिष्ठसर्वदा ॥२७॥
त्याची भार्याबहुगुणवती ॥ नाम जिचेंअसे अनुभुती ॥ जैसेंनामतैसेस्थिती ॥ महासाध्वीपतिव्रता ॥२८॥
पतीसेवेसी अतिततत्पर ॥ पतिच स्त्रियासीईश्वर ॥ पतिचरणींप्रेमथोर ॥ पती आज्ञेनेंवर्तत ॥२९॥
ऐसेतेदोघेउत्तम ॥ चालवितीगृहस्थाश्रम ॥ सत्कर्मयोगेंपरम ॥ पुण्यजोंडलेंअपार ॥३०॥
ऐसाकाळलोटलाफार ॥ तोमृत्युपावला भ्रतार ॥ सहगमनीचाविचार ॥ केलातेव्हांसतीनें ॥३१॥
तेव्हांअंतरिक्षवाणीबोलत ॥ सतिजाणें आहेउचित ॥ परिगर्भिणी आणिबालसुत ॥ त्यांनीसतीनजावें ॥३२॥
तूंतरि आहेसीपुत्रवती ॥ तोपुत्रबाल असेनिगुती ॥ पालनकरी त्यांचे निश्चिती ॥ शास्त्रसंमतीस्वधर्महा ॥३३॥
ऐसेंऐकोनीदेववाणी ॥ मान्यकरीधर्मचारिणी ॥ मगपुत्रहस्तेंकरुनी ॥ उचितकर्मकरविलें ॥३४॥
पुण्यवानतोब्राह्मण ॥ स्वर्गस्थसुखसंपन्न ॥ इकडे अनुभूतीआपण ॥ पुत्ररक्षनकरितसे ॥३५॥
पतिईश्वराभिन्न ॥ जाणोनीकरीपतीचेंध्यान ॥ तेणें चित्तशुद्धीहोऊन ॥ वैराग्यपूर्णउपजलें ॥३६॥
शारिराचाअनादर ॥ नावड़ेविषयउपचार ॥ तककरावें हानिर्धार ॥ केलाअसेसतीनें ॥३७॥
पुत्रप्रौढझालापाहून ॥ त्वरेनेंनिघेघरांतुन ॥ मेरुपर्वतीजाऊन ॥ तपश्चर्याआरंभिली ॥३८॥
तेथेमंदाकिनीचेंतीरीं ॥ पर्णकुटीनिर्मीलीबरी ॥ वासकरोनित्याभिंतरीं ॥ अष्टांगयोगाअरंभिला ॥३९॥
गंगाजळीस्नानकरोनी ॥ प्रातःकालचेकर्तव्यासारुनि ॥ मगबैसोनि आसनी ॥ प्राणायामअभ्यासीत ॥४०॥
नवद्वाररोधून ॥ पुरकरेचकसंपादन ॥ कूंभकवाढ़विला म्हणोनि ॥ प्राणमनस्थिरावले ॥४१॥
मगप्रत्याहारेंकरुन ॥ इंद्रियासकाढिंलेविषयांतुन ॥ पांच अंगेंअसेजाण ॥ कोणतेतेपुन्हांऐका ॥४२॥
यमानियमसेओन ॥ चौथाप्राणायामजाण ॥ प्रत्याहार पांचवा पूर्ण ॥ समजून घ्यासेसाधके ॥४३॥
पांच अंगांतहोउनिनिपुण ॥ पुढेंराहिले अंगेंतीन ॥ मगतेअभ्यासावेआपण ॥ यथाक्रमेंसाधके ॥४४॥
धारणाएकदुसरेंध्यान ॥ तिसरसमाधिम्हणुन ॥ अंगेंअसती याचेंलक्षण ॥ अनुक्रमेंजाणीजे ॥४५॥
परमात्मवस्तुकडेमन ॥ लाविलेंपरितेंचंचळजाण ॥ ध्येयसोडोनिभिन्नभिन्न ॥ विषयाकडेलागतसे ॥ ४६॥
प्रयत्नेंमनासीवळवावें ॥ देहस्वरूपीस्थिरकरावे ॥ यचाप्रयत्‍नासीम्हणावे ॥ धारणाम्हणवोनी ॥४७॥
प्रयत्नेमनास्थिरझालें ॥ विषयकल्पनाकरुंविसरले ॥ आत्मरूपीस्थिरावलें ॥ ध्यानबोलीलेंयासीच ॥४८॥
नस्फुरेध्यातानस्फुरेध्यान ॥ केवळध्येया कारमन ॥ होयतेंजाणावेंपूर्ण ॥ समाधीचेंलक्षण ॥४९॥
केलाअष्टांगयोगाभ्यास ॥ परमधर्मम्हणावे त्यास ॥ अनुभूतीनेंऐसेंयोगास ॥ संपादिलेप्रयत्नें ॥५०॥
ब्रह्मात्माजीवरूपघरून ॥ जडशरीरेंछिद्र पाडुन ॥ प्रवेशस्वये आपण ॥ ब्रह्मरंघ्रमहणतीयास्तव ॥५१॥
ईक्षणादीप्रवेशअंत ॥ ऐसीश्रुतीप्रमाणगर्जत ॥ तयाब्रह्मरंघ्रीनिश्चित ॥ अनूभुती व्यानकरितसे ॥५२॥
उपस्यपतीउपासकाआपण ॥ दोघाचाजडांश निरसुर ॥ उरलेशुद्धतेंब्रह्मापूर्ण ॥ ज्ञानदृष्टिनेंलक्षितसे ॥५३॥
ऐसातपश्चर्याकरित ॥ यसीकाळगेला बहुत ॥ ब्रह्मानंदीनिमग्नचित ॥ देहाभावासिरली ॥५४॥
तोविघ्नओढिवलेंथोर ॥ त्यारभ्यपर्वतावर ॥ कुकूरनामेंदानवेश्वर ॥ सेनेसहितपातला ॥५५॥
अश्वारुढहउनि ॥ मृगयार्थचहोकड़ेधावत त्यानेंदेखिली अकस्मात ॥ तपस्विनीअनुभुती ॥५६॥
निश्चळबैसली आसनावर ॥ किमर्थसेविलेंगंगातीर ॥ हीकोणाचीस्त्री असेसुंदर ॥ सर्वावयवेशोभवतसे ॥५७॥
ऐसातोदुष्टासुर ॥ मनांतकरितसे विचार ॥ होउनियाकामातुर ॥ तिचेजवळींपातला ॥५८॥
ध्यानस्थदेखोनीविस्मित ॥ मस्तकहालवोनिबोलत ॥ कोणतूंभाग्यवतीअदभुत ॥ बोलत्वरितमजपुढे़ ॥५९॥
कोणतेफलैच्छुनीमनीं ॥ दुर्धरतपकरिसीमानीनी ॥ त्रिलोकीआहेतबहुतकामिनी ॥ परिऐसेंतपकोणीकरिती ॥६०॥
धन्यतुं स्त्री असोनिनिश्वळ ॥ तरीसोडीदुःखरुपहेंसकळ ॥ माझीभार्याहोइकेवळ ॥ सुखापारभोगसी ॥६१॥
मीकुकुरनामेंदानवेश्वर ॥ सर्वदेवमाझेंकिंकर ॥ मीचत्रैलोक्यपतीथोर ॥ सर्वऐश्वर्यसंपन्नमी ॥६२॥
मजसहस्त्रभार्याअसतीसुंदर ॥ त्यांततुजलाकरीनथोर ॥ इच्छीसीतेदेईनसत्वर ॥ बोलमजलालवलाही ॥६३॥
शंकरम्हणतसेवरिष्ठासी ॥ ऐकेपुढिलीयावृत्तासी ॥ दानवेबहुप्रार्थिलेतिसी ॥ परिउत्तर नदेत ॥६४॥
कारणतीतरीसमाधिस्त ॥ इंद्रयलनिझालसिमस्त ॥ श्रोंत्रेंद्रिनाइकेमात ॥ मनासहित लीन झालें ॥६५॥
त्वगींद्रियनघेस्पर्शासी ॥ चक्षुनपाहेरूपासी ॥ वाणीनबोलेवचनासी ॥ कल्पनेसहित मनबुडाले ॥६६॥
चित्तचिंतनासहित ॥ बुद्धिजिरालीनिश्चययुक्त ॥ अहंकारगळालाजेथचातेथ ॥ मगकोणदेहातेसावरी ॥६७॥
जागृतीस्वप्रसुषुप्ती ॥ यावस्थेचीउडालीभ्रातीं ॥ साक्षी उरलास्वयंजोती ॥ दृश्यातीतस्वयंभु ॥६८॥
आतांयेथेंश्रोतेंचतुर ॥ अक्षेपकरितेझालेथोर ॥ जीवन्मुक्ताचेंशरीर ॥ कैसेंराहतेतेंसांगा ॥६९॥
वक्ताम्हणेऐकाउत्तर ॥ जैसेंबद्धजीवाचेंशरीर ॥ तैसेंचमुक्ताचेंकलेवर ॥ प्रारब्ध कामेंबर्ततसे ॥७०॥
संचितक्रियमाणप्रारब्ध ॥ ऐसेजिवाचेकर्मत्रिविध ॥ संचितक्रियामानहोती दुग्ध ॥ ब्रह्माज्ञानेकरोनी ॥७१॥
भोगसुखदुखाचादेऊन ॥ प्रारब्धकर्महोतसेक्षीण ॥ तेव्हांदेहपावेपवन ॥ विदेहमुक्ततामगपावे ॥ ७२॥
समाधीकाळींहोयमुक्त ॥ पुन्हाअंउत्थानीबद्धहोत ॥ ऐसीकल्पनान करावीनिश्चित ॥ ऐकाचित्तदेउनी ॥७३॥
सविकल्पनिर्विकल्प ॥ हैदोनसमाधीचेंरूप ॥ दृढ़ाअभ्यासे निर्विकल्प ॥ समाधीसुखापावतसे ॥७४॥
तेथेंप्रारब्धाचानसेवेग ॥ म्हणुनीनघड़ेसुखदुःखभोग ॥ परि सविकल्पसमाधीकाळींयोग ॥ प्रारब्धाचाहोतसे ॥७५॥
तेव्हांभोगाचेंसाधन ॥ असतींइद्रिय आणि मन ॥ भोक्ताचिदाभ्यासजीव आपण ॥ सुखदुखातेभोगितो ॥७६॥
ज्ञाताज्ञानबळेकरून ॥ सुखदुःखभोगाचासाक्षीपूर्ण ॥ जैसेंइतरसेसुखदुःख ॥ इतरसाक्षित्वेंजाणतो ॥७७॥
अनुभूतीचें अंतः करण ॥ ब्रह्मरूपींझालसेंलग्न ॥ नसेदेहोंद्रियचिभान ॥ वाचेसीमौनपडियले ॥७८॥
कांहीचउत्तरनसे देत ॥ जाणोनीदुष्टतोकाममोहीत ॥ टोळ्यापिटोनीगर्जनाकरीत ॥ मेघाऐसीदुःसह ॥७९॥
ऐसा पापीमायावीअसुर ॥ गर्जनाकरीतभयंकर ॥ तेणेकिंचितचळलेंअंतर ॥ बहिर्मुखवृत्तिझाली ॥८०॥
कांहींतरीविघ्नपातलें ॥ ऐसेंमनींतिनेंभाविलें ॥ मनोनिग्रहकरोनिचांगले ॥ अंतरमुखकरितसे ॥८१॥
दृढ़निश्चयकरोन ॥ तीव्रधरिलेब्रह्मानुसंधान ॥ नबोलेनपाहेनेत्रउघडोन ॥ धन्यधन्यानुभूती ॥८२॥
हीतरीआहेपतिव्रता ॥ दृढसंकल्पचातत्वता ॥ कळोंआलेत्याउन्मत्ता ॥ परिमदनबाणेंबिंधिला ॥८३॥
अनुचितकर्मासीप्रवृत्त ॥ झालापापकर्मासीउदीत ॥ चित्तझलिंसेमोहित ॥ होणारतेनटळेची ॥८४॥
विनाशकाळीबुद्धिविपरीत ॥ रावनसितेसीउचलोननेत ॥ पांडवजायानेउनीसभेंत ॥ विटंबिलीकौरवें ॥८५॥
अग्निहोत्रशाळेआंत ॥ श्वानप्रवेशकरीत्वरीतं ॥ पुरोडाशनेंउपाहत ॥ स्पर्शकरीतधावोनी ॥८६॥
तैसाचहाचांडाळ ॥ कुकुरनामाअसुरपाळ ॥ येऊनीअनुभूतीच्याजवळ ॥ स्पर्शकरितस्तनासी ॥८७॥
उचलुनीन्यावयाइच्छीदृष्ट ॥ परीतीसाध्वीतपोनिष्ठ ॥ भक्तिनिष्ठातिलाकाष्ट ॥ होउनेदीजगदंबा ॥८८॥
जगदाधारजगज्जननी ॥ मायानियंत्राआदीभवानी ॥ भक्तसाधुधार्मिका लागुनी ॥ सदारक्षणकरितसे ॥८९॥
ब्रह्मानिष्ठजडभरत ॥ शत्रुमित्र भावर हित ॥ त्याचाकरावयाघात तस्करपापिष्टप्रवर्तले ॥९०॥
तेव्हाभगवतीभद्रकाळी ॥ धांवतपातलतीत्काळीं ॥ मारुनीदुर्जनातये वेळीं ॥ जडभरतासीराक्षिलें ॥९१॥
ऐसीदयाळमाउली ॥ भक्तवत्साचीगाउली ॥ शरणांगतासी साउली ॥ सुखसितळकरितसे ॥९२॥
विश्वाघारजगज्जननी ॥ परमेश्वरींअभयकारणी ॥ अनुभुतीचे संकष्टनिवारोनी ॥ सुखापारदेईल ॥९३॥
तीकथाकेवळसुधारस ॥ पुढेलेअध्यायीआहेसुरस ॥ विनवितोपांडुरंगजनार्दनदास ॥ सज्जनश्रोत्यांसाआदरें ॥९४॥
स्कंदपुराणविख्यात ॥ सह्याद्रीखंडादभुत ॥ तुळजामहात्मसुंदरग्रंथ ॥ प्रथमोध्यायगोडहा ॥९५॥
इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडे ॥ तुळजामहात्मे ॥ प्रथमोध्यायः ॥१॥
श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ श्रीशुभंभवंतु ॥