श्रीगणेशायनमः ॥ जीअनादिशक्तिभवानी ॥ त्रिविधतापविध्वसिनी ॥ भोगमोक्षप्रदायिनी ॥ नमनतिच्याचरणासी ॥१॥
स्कंदम्हणेधारासुरें ॥ युद्धींजिंकूनीदेवसारे ॥ राज्यभ्रष्टकेलेंअसुरें ॥ सर्वदेवासीजेधवां ॥२॥
तेव्हांसर्वदेवामिळून ॥ ब्रह्मासीगेलेशरण ॥ सत्यलोकांसीजाऊन ॥ सांगतीगार्हाणेंदैत्याचें ॥३॥
म्हणतीधारासुरेंत्रासिलें ॥ युद्धीआम्हांसीजिंकिलें ॥ आम्हींसीस्थानभ्रष्टकेलें ॥ ऐश्वर्यनेलेंसर्वाअमुचें ॥४॥
आम्हींआतांकायकरावें ॥ कोठेंलपुनराहावें ॥ योगक्षेमचालावे ॥ कैशारीतींआमुचें ॥५॥
दैत्यभयेंउद्विग्न ॥ लोकपतीतुजआलोंशरण ॥ आतांआमुचेंसंरक्षण ॥ कृपेनें केलेंपाहिजे ॥६॥
दैन्ययुक्तदेवाचीवाणी ॥ चतुराननेंऐकोनीकर्णीं ॥ इंद्रप्रमुखदेवालगुनी ॥ अभय देऊनीबोलत ॥७॥
ब्रह्माम्हणेधारासुर ॥ तेणेंतपकेळेंदुर्धर ॥ म्यांपत्यासदिधलावर ॥ तेणेंउन्मत्तबहुझाला ॥८॥
पापिष्टेंतुम्हांसीपीडिलेंफार ॥ तुमचेघेतलेंधनाधिकार ॥ याचापूर्वीचकरुनीविचार ॥ ठेविलाआहेदेवहो ॥९॥
दैत्यांचाहोऊनीपराभव ॥ तुमचेंतुम्हांसीमिळावेवैभव ॥ हाचौपायचिंतिलायास्तव ॥ शरणजावेंहृषींकेशा ॥१०॥
क्षीराब्धिसागरींउत्तम ॥ तेथेंशेषशाईपुरुषोत्तम ॥ लोकनाथघनःश्याम ॥ रक्षणकर्तासर्वांचा ॥११॥
शंकरासीसर्वेंघेऊन ॥ तुम्हींआम्हीसर्वमिळोन ॥ नारायणासीजाऊंशरण ॥ सांगूंगार्हार्णदैत्यांचें ॥१२॥
तोपरमात्माहृषीकेश ॥ निश्चियेंमारिलदैत्यांस ॥ त्यावांचुनइतरास ॥ वध्यनहोयसर्वथा ॥१३॥
स्कंदम्हणेऋषीसी ॥ इतुकेबोलोनीदेवासी ॥ लोकपातमहावेगेंसी ॥ देवसमुदायघेऊनसवें ॥१४॥
गेलाक्षीरसागरासी ॥ सर्वहीदेवचाललेवेंगेंसी ॥ पातलेक्षीराब्धीत्तीरासी ॥ समुद्रशोभापाहतेझाले ॥१५॥
बहुयोजनविस्तीर्ण ॥ जोपूर्वींमंदरपर्वत त्यांतघालून ॥ सुरासुरेंमंथिलापूर्ण ॥ तेणेंकरोनीशोभलाजी ॥१६॥
शुक्तिकादितबहुतपदार्थ ॥ लाटेसरिसेंबाहेरयेत ॥ लाटाउसळृनगगनपंथ ॥ पाहुनीयेतीतळावरी ॥१७॥
चंद्राचाउदयअस्तमान ॥ तेव्हांवृद्धीसीपावेजाण ॥ जलजंतुज्यांतअसतीव्यापून ॥ मच्छकच्छनक्रादि ॥१८॥
मच्छादिउसळोनधांवत ॥ तेणेंखळबळहोतसेबहुत ॥ दक्षिणावर्तवामावर्त ॥ शंखबहुज्यामाजीं ॥१९॥
रत्नजातीबहुत असती ॥ नीलपीतरक्तदीप्ती ॥ प्रभाचहुंकडेपसरती ॥ शोभादिसतीअतिशय ॥२०॥
लाटाबहुतधांवती ॥ मर्यादावेलेपर्यंतजाती ॥ लाटसवेंभूमीवरीयेती ॥ अनेकरत्नेंअमोलिक ॥२१॥
नेणोंकायभूलींगशंकर ॥ त्यासीदुग्धाभिषेककरितोसागर ॥ नानारत्नेंसुमनहार ॥ अर्पणकरितश्रद्धेनें ॥२२॥
जेथेंवायुसुगंधमंद ॥ श्रमहारकवहातसेसुखद ॥ वेलातटींमुनीचेवृंद ॥ शाश्वतब्रह्माउच्चरिती ॥२३॥
कित्येकध्यानपरत ॥ अस्थिचर्ममयरोडबहुत ॥ परब्रह्मारुपीनिष्णात ॥ सुहृदसर्वजीवमात्रा ॥२४॥
कित्येकशिष्यासीपढविती ॥ आचारशिक्षापद्धतीदाविती ॥ क्षीरसागरतीराप्रती ॥ देवाअलेसर्वही ॥२५॥
पाहुनीविस्मयकरितीमनांत ॥ ब्रह्मारुद्रप्रमुखसुरसमस्त ॥ उत्तरतीरींजाऊनीनिश्चित ॥ आरंभकरितीस्तुतीसी ॥२६॥
देववंद्याकरुणामूर्तीं ॥ नमोनमोतुजकलमूर्तीं ॥ विष्णोतुजनमोपुढती ॥ केसीसुदनविश्वरूपा ॥२७॥
नमोधरणीपालद्विजपालक ॥ नमोज्ञानातीत अद्वैतबोधक ॥ त्रीगुणातीतरुपसदैक ॥ चिंदानंदरुपातुजनमो ॥२८॥
नमोवेदवेदांगातीत ॥ वेदगर्भदिव्यहृदयस्थ ॥ दिव्यरुपधरयोगप्राप्त ॥ योगीध्येयातुजनमो ॥२९॥
योगगर्भयोगगम्यस्वरुपा ॥ सृष्टिस्थितीलयकरणनिरुपा ॥ नरकर्णावतारकचतुर्भूजरुपा ॥ शेषपर्यकशायीतुजनमो ॥३०॥
श्रीवत्सवक्षसापीतवसना ॥ पद्मनाभाश्रीपतिमधुसूदना ॥ नमोपद्मपत्रायतलोचना ॥ यज्ञरूपायज्ञपते ॥३१॥
यज्ञावनमालीकौस्तुभधरा ॥ चक्रशंखपद्मधरा ॥ खंडधराहलधरापरात्परा ॥ परमानंदगुरुरूपातुजनमो ॥३२॥
जलरूपास्थुलरुपानारायणा ॥ दैत्यभयहरादानसुदना ॥ दैत्यापाओस्नीकरीरक्षणा ॥ शरणाअलोंतुजाआम्ही ॥३३॥
तुंचाअमचेंपरमदैवत ॥ तुझाच आश्रय आम्हसीनिश्चित ॥ तुंचकैवारीसदोदित ॥ आम्हास्वर्गस्थातुंत्राता ॥३४॥
स्कंदम्हणेत्र्यैलोक्यनायक ॥ विष्णुदेवेशभक्तपालक ॥ देवांनीस्तवितसंचकृपासम्यक ॥ करावयाप्रगटलाभुमिवरी ॥३५॥
शेषपर्यंकशयनावरती ॥ शयनकरीतमंगलाकृति ॥ पूर्णचंद्रवतवदनकांती ॥ कुरळकेशशोभती ॥३६॥
कंबुकंठघनाकृती ॥ दिर्घलोचनसुदंपक्ति ॥ सरळनाह्सिकामकराकृती ॥ कुंडलेंशोभतींकर्णद्वयीं ॥३७॥
मस्तकींकिरीटविराजपान ॥ दिव्यहार कौस्तुभरत्न ॥ दीर्घचतुर भुजश्रीवत्सलांछन ॥ विराजमानदीर्घहृदय ॥३८॥
त्रिवळीयुक्त उदर ॥ गंभीरनाभीपीतांबर ॥ शंखचकगदाधर ॥ कंकणमुद्रीकाशोभती ॥३९॥
हस्तपादतल आरक्त ॥ सर्वावयवसुंदरबहुत ॥ लक्ष्मीपादसेवाकरीत ॥ निजांकींचरणधरोनी ॥४०॥
परमनम्रावेनसासुत ॥ हस्तजोडोनिउभातिष्ठत ॥ मुनीसमुदायस्तुतिगात ॥ गायनकरीतनारदमुनी ॥४१॥
ऋद्धिसिद्धिचामरेंढाळती ॥ सुवर्णवेत्रघेऊनीहातीं ॥ द्वारपालद्वारींउभेअसती ॥ सेवाकरितीनिरंतर ॥४२॥
पुढेंअप्सरान्रुत्यकरिती ॥ हावभावबहुदाविती ॥ नृत्यापाहातलक्ष्मीपती ॥ ऐसादेवांनींअवलोकिला ॥४३॥
धवधवीतविष्णुमूर्ती ॥ प्रगटझालीस्वयंजोती ॥ नेत्रगोचरहोतांचक्षिती ॥ दंडवतनमितीसुरसर्व ॥४४॥
हस्तांजलीबद्धकरोनी ॥ जयजयकराकरितीध्वनी ॥ रोमांकिततनुहोऊनी ॥ बाष्पकंठीदाटले ॥४५॥
आधीचकेवळसात्विकदेव ॥ शुद्धसत्वात्मावासुदेव ॥ त्याचेंदर्शनेंअष्टभाव ॥ सत्वगुनाचेधाढले ॥४६॥
जैसेआधींचेनत्रप्रकाशक ॥ त्यावरीप्रगटझालाअर्क ॥ नेत्रासीप्रकाशहोय अधिक ॥ तैसेझालेंसर्वदेवा ॥४७॥
हृदयप्रेमभरेदाटलें ॥ त्यांतसात्विकभावप्रगटले ॥ जेंअष्टविधबोललें ॥ तेंकळलेंपाहिजेश्रोतया ॥४८॥
कल्पनासोडोनीचित्त ॥ उगेंचराहिलेंनिवांत ॥ हेंप्रथमलक्षनजाणावेंनिश्चित ॥ दुसरेंस्वेदशरीरासी ॥४९॥
तिसरारोमांचस्बरभंगचवथा ॥ शरीरासकंपतो पांचवाआतां ॥ विवर्णशरीरसहावेंतत्वता ॥ नेत्रासीअश्रुतेंसातवें ॥५०॥
आनंदांतचित्तबुडालें ॥ चित्तचित्तपणाविसरलें ॥ हेंआठवेंलक्षणबोलिलें ॥ सात्विकभावाचेंजाणिजे ॥५१॥
ऐसेंअष्टसात्विकभाव ॥ सुरवरासीप्रगटलेअपूर्व ॥ तेव्हांकृपाकटाक्षेंदेवाधिदेव ॥ अवलोकुनीबोलत ॥५२॥
मेघाऐसींगंभीरवाणी ॥ गजोंनबोलेलचक्रपाणी ॥ तेणेंसुरासीसुखदेऊनी ॥ चराचरगुरुहरिजेव्हां ॥५३॥
अभयदेऊनबोलेश्रीहरी ॥ तीकथाउतराध्यायींबरी ॥ पांडुरंगजनार्दनबैखरी ॥ व्याख्यानकरीलसंत कृपें ॥५४॥
इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडेतुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ विष्णुदर्शनंनामएकत्रिशोध्यायः ॥३१॥
श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥