रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. नवरात्र 2024
  3. नवरात्र उत्सव
Written By
Last Updated : शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (12:48 IST)

Navratri 2024 : स्तुती सुमने आई मी,उधळली

jagdamba mandir
स्तुती सुमने  आई मी,उधळली ,
वाहिली श्रद्धे ची ग श्रद्धांजली,
आळविले तुजला प्रेमभरे सर्वदा,
भाकली करुणा  तुझी ग सदा!
पुजली नित्य मी  तुझी पाऊले  ,
गीत तुझ्या साठीच ग गायिले,
आरती ओवाळून धन्य धन्य जाहले,
 अखंड ज्योत लावून नवरात्र मांडले,
खणा नारळा ने ओटी तुझी भरून,
सौभाग्याचे लेणं तुजला देऊन,
पदरी आनंद घेऊन, सहर्षे मी नाचली,
आई जगदंबे , सेवेने तुझ्या भावविभोर गे झाली!!
..अश्विनी थत्ते.