सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. नवरात्रि 2022
  3. नवरात्रि पूजा
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (09:26 IST)

तिसरी माळ : चंद्राघंटा देवीबद्दल 7 गुपित जाणून घ्या

नवरात्रीच्या काळात तिसर्‍या दिवशी चंद्रघंटा देवी स्वरूपाची पूजा केली जाते. जाणून घ्या 7 गुपित-
 
- चंद्र घंटा अर्थात् ज्यांच्या मस्तकावर चंद्राच्या आकाराचे तिलक आहे.
 
- चंद्रघंटा देवीचं बीज मंत्र - ‘ऐं श्रीं शक्तयै नम:’
 
- चंद्रघंटा देवीला आपलं वाहन सिंह खूप प्रिय आहे. चंद्रघंटा देवीचा रंग स्वर्ण समान चमकदार आहे.
 
- या दिवशी सोनेरी रंगाचे किंवा हलक्या तपकिरी रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले गेले आहे.
 
- या दिवशी दुधाने अभिषेक केल्याने तसेच दुधाने निर्मित पदार्थ अर्पित केल्याने दुखापासून मुक्ती मिळते.
 
- देवीचे तीन नेत्र आणि दहा हात आहे. हातात कमळ, गदा, बाण, धनुष्य, त्रिशूल, खड्ग, खप्पर, चक्र इतर अस्त्र-शस्त्र आहे.
 
- चंद्रघंटा देवीच्या कृपेमुळे साधकाचे सर्व पाप आणि अडथळे दूर होतात आणि तो पराक्रमी व निर्भय होतो.