1. धर्म
  2. नवरात्र 2023
  3. नवरात्र पूजा
Written By

योगेश्वरी देवी आरती

Shree Yogeshwari AmbaJogai
आरती धन्य अंबापूर महिमा विचित्र ! पार्वती अवतार योगिनी क्षेत्र
दंतासुरमर्दोनी केले चरित्र ! सिध्दांचे स्थळ ते महापवित्र
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी !
जयदेवीजयदेवी
 
पतित पावन सर्व तीर्थ महाद्वारी ! माया मोचन सकळ माया निवारी
साधका सिद्धीवाणेच्या तिरी ! तेथील महिमा वर्णू न शके वैखरी
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी !
जयदेवीजयदेवी
 
सिद्ध लिंग स्थळ परम पावन ! नृसिंह तीर्थ तेथे नृसिंह वंदन
मूळ पीठ रेणागिरी नांदे आपण ! संताचे माहेर गोदेवी स्थान !
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी !
जयदेवीजयदेवी
 
महारुद्र जेथे भैरव अवतार ! कोळ भैरव त्याचा महिमा अपार
नागझरी तीर्थ तीर्थाचे सार ! मार्जन करिता दोष होती संहार
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी !
जयदेवीजयदेवी
 
अनंत रूप शक्ती तुझ योग्य माते ! योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते
व्यापक सकळा देही अनंत गुण वर्णिते ! निळकंठ ओवाळू कैवल्य माते !
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी !
महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी !
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी