मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 सप्टेंबर 2023 (15:21 IST)

Beed : झोपेतच बायको आणि मुलावर जीवघेणा हल्ला करून गळफास घेतली

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे एका पिताने झोपले असलेल्या आपल्या पोटच्या मुलावर आणि स्वतःचा बायकोवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून हल्ल्यांनंतर पिताने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धक्कादायक घडली आहे.नरसिंग रानबा पवार असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. मयत नरसिंगची मानसिक अवस्था चांगली नव्हती. त्यांच्यावर उपचार सुरु होते.या हल्ल्यात मुलाच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे तर आईला किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
 
सदर घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. झोपलेले असताना नरसिंग यांनी कुऱ्हाडयाने पत्नी आणि मुलावर वार केले त्यात मुलगा व्यंकटेश पवारच्या गळ्याला गंभीर मार लागली आहे तर नरसिंग यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे. दोघेही मायलेकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घरात कोणी नसल्याने नरसिंग यांनी स्वतःला गळफास लावत आत्महत्या करत आयुष्य संपविले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाची नोंद केली आहे. हल्लेचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात  खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit