बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. नवरात्र 2024
  3. नवरात्र पूजा
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (05:00 IST)

Navratri 2024 दुर्गा देवीचे सातवे रूप कालरात्री

Kalratri
दुर्गा देवीचे सातवे रूप म्हणजे देवी 'कालरात्री' होय  दुर्गा देवीचे हे सातवे रूप कालरात्री देवी म्हणून प्रसिद्ध आहे.  नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते. 
 
दुर्गा मातेचे सातवे रूप कालरात्री देवीचे मंदिर हे वाराणसी मध्ये स्थित आहे. कालरात्री अर्थात संकटांचा नाश करणारी. माता कालरात्रीने राक्षसांचा वध केला म्हणून दुर्गामातेच्या या रूपाची पूजा रात्री केली जाते. तसेच शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी माता कालीचे विशेष पूजन होतं आणि मंत्रांचा जप केल्याने देवी प्रसन्न होऊन सर्वत्र विजय प्रदान करते. 
 
या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहे. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहे.  हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहे. व ते चमकदार आहे.कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. तसेच ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.
 
कालरात्री देवी पूजन विधी 
- नवरात्रीच्या सप्तमी तिथीला कालरात्री पूजन करण्यासाठी सकाळी उठून आधी स्नान करावे.
- आता देवीला कुंकु, अक्षता, दीप, धूप अर्पित करावं.
- देवीला रातराणीचे फुलं अर्पित करावे.
- गुळाचा नैवेद्य दाखवावा.
- देवीची आरती करावी.
- यासोबतच दुर्गा सप्तशती, दुर्गा चालीसा व मंत्र जाप करावा.
- या दिवशी लाल चंदन माळने देवी मंत्र जप करावा.
- लाल चंदन माळ उपलब्ध नसल्यास रूद्राक्षाच्या माळीने जप करावा.
 
-मा कालरात्री उपासना पद्धत-
देवी कालरात्रीला अक्षता, फुले, धूप, गंधक आणि गूळ इत्यादी अर्पण करावे. तसेच रातराणीचे फूल कालरात्रीला खूप प्रिय आहे. पूजेनंतर मा कालरात्रीच्या मंत्रांचा जप करावा आणि शेवटी आरती करावी.
 
मा कालरात्रीचे ध्यान- 
करालवंदना धोरां मुक्तकेशी चतुर्भुजाम्।
कालरात्रिं करालिंका दिव्यां विद्युतमाला विभूषिताम॥
दिव्यं लौहवज्र खड्ग वामोघो‌र्ध्व कराम्बुजाम्।
अभयं वरदां चैव दक्षिणोध्वाघ: पार्णिकाम् मम॥
महामेघ प्रभां श्यामां तक्षा चैव गर्दभारूढ़ा।
घोरदंश कारालास्यां पीनोन्नत पयोधराम्॥
सुख पप्रसन्न वदना स्मेरान्न सरोरूहाम्।
एवं सचियन्तयेत् कालरात्रिं सर्वकाम् समृद्धिदाम्॥
 
मा कालरात्रीचे मंत्र -
या देवी सर्वभू‍तेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
एक वेधी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता।
लम्बोष्ठी कर्णिकाकणी तैलाभ्यक्तशरीरिणी।।
वामपदोल्लसल्लोहलताकण्टक भूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी।।
 
देवी कालरात्रिचे कवच-
ऊँ क्लीं मे हृदयं पातु पादौ श्रीकालरात्रि।
ललाटे सततं पातु तुष्टग्रह निवारिणी॥
रसनां पातु कौमारी, भैरवी चक्षुषोर्भम।
कटौ पृष्ठे महेशानी, कर्णोशंकरभामिनी॥
वर्जितानी तु स्थानाभि यानि च कवचेन हि।
तानि सर्वाणि मे देवीसततंपातु स्तम्भिनी॥