रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2016 (13:39 IST)

सॅमसंग नोट ७ चे उत्पादन तात्पुरते थांबवले

गेल्या काही दिवसांमध्ये सदोष बॅटरीमुळे बदलून दिलेल्या सॅमसंग नोट ७ मधूनही 
धूर निघाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता सॅमसंगने नोट ७ या फोनचे 
उत्पादन तात्पुरते थांबवले आहे. यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची 
शक्यता आहे. सॅमसंगने काही महिन्यांपूर्वी गाजावाजा करत दिमाखदार सोहळ्यात 
गॅलेक्सी नोट ७ हा मोबाईल फोन लाँच केला होता. पण सदोष बॅटरीमुळे फोनने पेट 
घेतल्याची घटना समोर आली होती. जगभरात अशा स्वरुपाच्या ३० हून अधिक घटना 
घडल्याने सॅमसंगला बाजारातून नोट ७ मोबाईल परत मागवावा लागला होता. सॅमसंगला 
जगभरातून सुमारे २५ लाख नोट ७ फोन परत मागवले. मात्र आता नव्याने दिलेल्या नोट 
७ मधूनही धूर निघाल्याची माहिती समोर आली आहे. फोनमधून धूर निघाल्याने एक 
विमान खाली करावे लागले होते. त्यामुळे सॅमसंगने शेवटी नोट ७ या फोनचे उत्पादन 
थांबवले आहे.