शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2019 (16:51 IST)

Xiaomi CC सीरीजचा पहिला फोन 2 जुलै रोजी होणार लाँच

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचा नवीन सीरीजचा फोन लवकरच लाँच केला जाईल. ही CC सीरीज आहे. कंपनीचे सीईओ आधीच याबद्दल माहिती देऊन चुकले आहे की हा फोन तरुण आणि क्रिएटिव्ह लोकांसाठी आहे. या सीरीजचा पहिला फोन CC9 असू शकतो आणि तो 2 जुलैपर्यंत सादर केला जाऊ शकतो. कंपनीने ही तारीख आपल्या अधिकृत पेजवर दिली आहे.
 
या माहितीनुसार चीनच्या बीजिंग शहरात हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. टेक जगतच्या मते या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, कंपनीने गेल्या वर्षी एका Meitu नावाची कंपनी विकत घेतली होती, तर या CC सीरीजच्या फोनमध्ये फ्लिप कॅमेरा दिला जाऊ शकतो. या प्रकाराचा कॅमेरा नुकतेच Asus Zen 6 मध्ये पाहायला गेला होता. 
 
कंपनीने CC सीरीजच्या फोनचे अधिकृत प्रोमो दर्शविले होते, त्यात CC9E आणि CC9 माहिती देण्यात आली होती.