बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (12:03 IST)

Huawei Mate 20 लाँच, हे आहे धमाकेदार फीचर्स...

Huawei ने मेट सिरींजचे नवीन स्मार्टफोन Huawei Mate 20 ला लंडनच्या एका इंवेंटमध्ये लाँच केले आहे. हा स्मार्ट फोन ग्रीन, मिडनाइट ब्लू, पिंक गोल्ड, ट्वाइलाइट आणि काळ्या रंगांमध्ये उपलब्ध असेल. जाणून घ्या फोनचे फीचर्स-
 
Huawei Mate 20 चे फीचर्स : Huawei Mate 20 स्मार्टफोन एंड्रॉयड 9.0 पाई पर आधारित ईएमयूआई 9.0 वर चालेल. यात 6.53 इंचीचा फुल-एचडी+ (1080x2244 पिक्सल) आरजीबीडब्ल्यू डिस्प्ले आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 18.7:9 आहे. फोनमध्ये हायसिलिकॉन किरिन 980 प्रोसेसरचा प्रयोग करण्यात आला आहे. हा ड्‍यूल एआय प्रोसेसरने लेस आहे. फोनची बॅटरी 4000 एमएएचची आहे. हा 40 वॉट हुवावे सुपरचार्ज टेक्नॉलॉजीसोबत येईल.
 
कसा आहे कॅमेरा : Huawei Mate 20 मध्ये लाइका ट्रिपल रियर कॅमेरा आहे. यात एफ/2.2 अपर्चर असणारा 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल सेंसर आहे. त्याचसोबत 12 मेगापिक्सलचा वाइड एंगल सेंसर आहे, एफ/1.8 अपर्चरसोबत. 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेसपण आहे. हा   एफ/2.4 अपर्चर वाला सेंसर आहे. तिन्ही कॅमेरे एलईडी फ्लॅश आणि सुपर एचडीआर स्पोर्टसोबत येतात. कनेक्टिविटीसाठी Mate 20मध्ये 4जी एलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सामील आहे.