गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (08:59 IST)

ज्या लोकांकडे नोकियाचा हा मॉडेल आहे त्यांसाठी एक चांगली बातमी...

नोकिया 6.1: नोकिया स्मार्टफोन्सची निर्मिती व वितरण करणारी फिनलंडची कंपनी, एचएमडी ग्लोबलने जाहीर केले आहे की नोकिया 6.1ला अँड्रॉइड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) मिळविणे सुरू झाले आहे. हा एचएमडीचा दुसरा स्मार्टफोन आहे, ज्याला अँड्रॉइड पाई प्राप्त झाले आहे, जे अँड्रॉइड ओएसची 9वा मुख्य अपडेट आणि 16व्या आवृत्ती आहे.
 
कंपनीने मंगळवारी रात्री एका निवेदनात म्हटले आहे, 'नोकिया 6.1 ला गूगलने अँड्रॉइड वन कुटुंबासाठी निवडले आहे, म्हणून या फोनच्या वापरकर्त्यांना 'अॅप्स ऍक्शन्स' वर खास प्रवेश मिळतो. हे वैशिष्ट्य केवळ अँड्रॉइड वन आणि गूगल पिक्सेल डिव्हाइसेसवर दिले गेले आहे. 'अॅप्स ऍक्शन्स' वापरकर्त्यांना गोष्टी लवकर करण्यास मदत करतो. अँड्रॉइड पाईमध्ये बरेच नवीन फायदेशीर वैशिष्ट्ये आहे, ज्यात अॅडॅप्टिव्ह ब्राइटनेस एक आहे जे वापरकर्त्यांची निवडीची ब्राइटनेस ओळखून घेतो आणि स्वतःस त्यास सेट करतो.