मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मार्च 2020 (13:27 IST)

ओप्पो रेनो 3 प्रो ची प्री बुकिंग सुरु, कॅमेरा आहे मोठी खासियत

ओप्पो रेनो 3 Pro भारतात जगातला पहिला ४४ मेगापिक्सल ड्युल पंच होल सेल्फी कॅमेरासह स्मार्टफोन लॉन्च केला आहे. भारतात २९,९९० रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लॉन्च झालाय. फोन ६ मार्च २०२० पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्रीसाठी  उपलब्ध होणार आहे. मोबाईलची प्री बुकिंग सुरु आहे. 
 
भारतात हा मोबाईल दोन प्रकारांत लॉन्च केलाय. ८ जीबी + १२८ जीबी वेरिएंट २९,९९० रुपये आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट ३२,९९० रुपयांत लॉन्च झाला आहे. हा फोन Auroral Blue, Midnight Black आणि White या तीन रंगात बाजारात आणलाय. 
 
या स्मार्टफोनच्या लॉन्च ऑफरमध्ये, HDFC Bank, ICICI बँक, RBL बँक आणि येस बँकच्या कार्डमधून पेमेंट केल्यास ग्राहकांना १० टक्क्यांचा डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय कंपनी Reno 3 Pro सह वायरलेस स्पीकर आणि Oppo Enco Free वायरलेस हेडफोनवर २००० रुपयांचा डिस्काऊंट ऑफर आहे.  
 
क्वार्ड रियर कॅमेरा सेटअप - ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आलाय. रियर कॅमेरा सेटअपमध्ये १३ मेगापिक्सल टोलिफोटो शूटर कॅमेरा सेन्सर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड ऍन्गल सेन्सर देण्यात आला आहे. २ मेगापिक्सल मोनो सेन्सर आहे. ४४ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, शिवाय २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सरही देण्यात आला आहे.