बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: ख्राईस्टचच , सोमवार, 2 मार्च 2020 (10:19 IST)

#INDvsNZ न्यूझीलंडचा भारतावर ७ गडी राखून विजय

न्यूझीलंड दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला दुसऱ्या व्हाईटवॉशला सामोरं जावं लागलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला आहे. आज ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने यजमानांना १३२ धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान ७ गडी राखत पूर्ण केलं. त्यामुळे एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 
 
न्यूझीलंड रविवारी पहिल्या डावात 235 धावांवर ऑलआऊट झाला. लाथमने पहिल्या डावात अर्धशतकी कामगिरी केली. त्याने 52 धावा केल्या. काईल जैमीसन 49 आणि ब्लेंडलने 30 धावा केल्या. मोहम्मद शमीने भारताकडून सर्वाधिक 4, जसप्रीत बुमराहने 3, रवींद्र जडेजाने 2 आणि उमेशने 1 गडी बाद केला. भारताकडून पहिल्या डावात पृथ्वी शॉने 54, हनुमा विहारीने 55 आणि पुजाराने 54 धावा केल्या. दुसरीकडे, किवी टीमकडूनजैमीसनने टेस्ट कारकिर्दीत पहिल्यांदा पाच विकेट्स घेतल्या.