गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2019 (14:47 IST)

Oppo Reno मध्ये 48 मेगापिक्सेल कॅमेरा?

अलीकडे Oppo ने आपल्या सब ब्रँड Reno ची माहिती दिली होती. या ब्रँडचा फोन 10 एप्रिलला लॉचं केला जाईल आणि यात 48 मेगापिक्सेल कॅमेरा असू शकतो. ओप्पो रेनोचा एक व्हिडिओ टीझर लीक झाला आहे. माहिती मिळाली आहे की रेनो ब्रँडचा पहिला फोन 10x लॉसलेस झूम लेन्ससह येईल जे MWC 2019 मध्ये लॉचं करण्यात आला होता. 
 
रेनोच्या या फोनमध्ये 6.4 इंच स्क्रीन असेल. फोनला स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसरसह सूचीबद्ध केलं गेलं आहे. यात 48 मेगापिक्सल रिअर सेन्सरसह 5 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा असेल. 16-मेगापिक्सेल सेन्सर फ्रंट पॅनलवर देण्यात येईल. कनेक्टिव्हिटी फीचरमध्ये ब्लूटूथ 5.0 आणि वाय-फाय 802.11 समाविष्ट आहेत. हे फोनमध्ये पेरिस्कोप स्टाइल लेंस इंटिग्रेशनचे सिग्नल देते. टीझरमध्ये फोनचा मागील भाग दृश्यमान आहे. येथे ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप स्पष्टपणे दृश्यमान आहे. या व्यतिरिक्त 10x लॉसलेस झूम तंत्रज्ञान देखील लॉन्च केला जाईल. मोबाइल वर्ल्ड कॉन्ग्रेस इव्हेंटमध्ये ओप्पो ने माहिती दिली होती की 10x लॉसलेस झूम टेक्नॉलॉजी आता मार्केटसाठी तयार आहे. हे 2019 च्या दुसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनचा भाग बनविला जाईल. तथापि, सध्या कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही आहे.