1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (17:48 IST)

4 जीबी रॅमसह Poco F1 Lite येण्याची शक्यता

Xiaomi चा सब ब्रँड Poco F1 Lite ला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरसह सूचीबद्ध केले गेले आहे. उल्लेखनीय आहे की Poco F1 Lite गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Poco F1 याहून वेगळं आहे. 
 
हे अँड्रॉइड 9.0 पाईवर चालेल. गेल्या वर्षी Poco F1 ला अँड्रॉइड पाई अपडेट मिळाले होते आणि अलीकडे हँडसेटला मीयूआय बीटा अपडेटसह Widevine L1 सपोर्ट मिळाले आहे. तरीही कंपनीच्या वतीने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. 
 
आगामी स्मार्टफोन 1.61GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरसह 4 जीबी रॅमसह येईल. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Poco F1 ला अँड्रॉइड 8.1 ऑरियो आधारित MIUI 9.6 सह सादर केले गेले होते.
 
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हँडसेटला अँड्रॉइड पाईवर आधारित मीयूआय 10 अपडेट मिळाले होते. हे हँडसेट स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आणि 8 जीबी पर्यंत रॅमसह येतो. नवीन मॉडेल आणण्याऐवजी Xiaomi ने आपल्या Poco F1 स्मार्टफोनला अनेक सॉफ्टवेअर अपडेट दिले आहेत.