शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By भाषा|
Last Modified: बीजिंग , गुरूवार, 14 ऑगस्ट 2008 (12:01 IST)

अंजलीचा नेम पुन्हा चुकला

बिंद्राच्या अभिनव कामगिरीनंतर राज्यवर्धन राठोडने भारतीय क्रीडा प्रेमींची निराशा केली, आता पुन्हा एकदा अंजली भागवत आणि अवनीत कौर या दोनही भारतीय खेळाडूंनी क्रीडा प्रेमींना निराश केले.

या दोघीही 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रवेश फेरीतून बाहेर पडल्या आहेत. अंजलीने 571 स्कोर करत 32व्या स्थानावर आली. या स्पर्धेत प्रवेश फेरीत 552 अंक मिळवत अवनीत 43 स्पर्धकांमध्ये 42वी होती. यजमान चीनच्या ली ड्यू ने 589 अंक मिळवत सुवर्ण पदक जिंकले.