1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (19:45 IST)

चांगले सादरीकरण करण्यासाठी काय करायचे टिप्स जाणून घ्या

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात यश मिळविण्यासाठी सादरीकरण म्हणजे प्रेझेन्टेशन महत्त्वाचे आहे. जेवढे चांगले सादरीकरण असणार लोक अधिक प्रभावित होणार.चांगले सादरीकरण देऊन आपण यशाचा शिखर गाठू शकता. चला तर मग जाणून घेऊ या की चांगले  सादरीकरण करण्यासाठी काय करावे. 
 
1 सल्ला घ्या -
सादरीकरण करताना आपण प्रेक्षकांकडून देखील सल्ला घ्यावा, अशा प्रकारे आपण आपला मुद्धा त्यांच्या पर्यंत सहजरित्या मांडण्यास सक्षम असाल.प्रेक्षकांना देखील बोलण्याची संधी द्या, त्यांच्या प्रश्नांचे उत्तरे देऊन आपण पुढे चला.  
 
2 संवाद कला- 
बोलताना, विषयानुसार आपल्या आवाजाच्या चढ उताराकडे लक्ष द्या, अशा प्रकारे आपण आपली बोलण्याची कला विकसित करू शकता. 
 
3 स्लाईड्स कडे बघून बोलू नका-
सादरीकरण करताना स्लाईड्स कडे बघून बोलू नका,आपल्या सादरीकरणाची पूर्व तयारी करून ठेवा, जेणे करून आपले प्रेझेन्टेशन चांगले होईल. बघून बोलल्यावर त्याचा परिणाम चांगला होणार नाही आणि आपली छवी चांगली होणार नाही, त्याचा परिणाम नकारात्मक होऊ शकतो. 
 
4 वेळेची काळजी घ्या-
सादरीकरण करताना वेळेची काळजी घेणे आवश्यक आहे. सादरीकरण फार मोठे नसावे. सादरीकरण मोठे असेल तर त्या दरम्यान अंतराळ घ्या. अन्यथा लोक मध्यभागी सोडून निघून जातील. 
 
5 उदाहरणाचे वापर करा-
सादरीकरण करताना  त्या दरम्यान उदाहरणे देत राहावे. या मुळे लोकांना सहज समजू शकेल, आणि ते आपल्या गोष्टींना लक्ष देऊन ऐकतील. 
 
6 काळजीत किंवा नर्व्हस नसावे- 
सादरीकरण करताना आपण नर्व्हस होऊ नका, कारण हे आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करेल आणि आपण विषया पासून भरकटू शकता, म्हणून आपल्या विषयाची सखोल आणि पूर्व तयारी करावी.  
 
7 ग्राफिक्स चा वापर करा- 
आपण सादरीकरण करण्यासाठी ग्राफिक्सचा वापर करावा. जेणे करून आपण पीपीटीच्या माध्यमाने स्लाईड्स बनवून आपले सादरीकरण सहज करू शकता.