शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (12:56 IST)

स्वयंपाकघराचे वास्तू कसे असावे जाणून घ्या...

* कुकिंग स्टोव्ह, गॅस किंवा कुकिंक रेंज स्वयंपाकघराच्या दक्षिण पूर्वी कोपर्‍यात असावे. हे असे ठेवावे की जेवण तयार करणार्‍याचं तोंड पूर्वीकडे असावे.
* पाण्याचा संग्रह उत्तर पूर्वी दिशेकडे असावा.
* सिंकसाठी उत्तर पूर्व दिशा योग्य.
* विजेच्या सामानासाठी दक्षिण पूर्व किंवा दक्षिण दिशा योग्य ठरेल.
* फ्रीज पश्चिम, दक्षिण, दक्षिण पूर्व किंवा दक्षिण पश्चिम दिशेत ठेवू शकता.
* धान्य आणि इतर खाद्या सामुग्री, भांडी, क्रोकरी पश्चिम किंवा दक्षिण दिशेत ठेवावे.
* वास्तूप्रमाणे किचनची कोणतीही भिंत बाथरूम किंवा शौचालयाला लागून नसावी. किचन बाथरूम किंवा   शौचालयच्या वर किंवा खालीही नसलं पाहिजे.
* किचनचे दार उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे उघडावे.
* खिडक्या आणि एक्झॉस्ट फॅन पूर्वीकडे असावं, हे उत्तर भिंतीवरही लावू शकता.
* शक्योतर स्वयंपाकघरात पूजा स्थळ नसावं.
* किचनमध्ये डायनिंग टेबल नसावं, आणि ठेवावं लागलं तर उत्तर पश्चिम दिशेत असावं आणि जेवताना चेहरा पूर्व किंवा उत्तर कडे असावा.