बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (17:11 IST)

पुण्यातून 3 रक्तचंदन तस्कर जाळ्यात, 27 लाखांचे रक्तचंदन जप्त

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 27 लाख रुपये किमतीचे तब्बल 270 किलो रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
 
विकी संजय साबळे (वय 20), रोहित रवी रुद्राप (वय 19) आणि अलेंन कन्हैया वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या पोलिसांना रक्त चंदनाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी लोणी काळभोर पोलीस  ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला होता. दरम्यान पुणे सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर टोल नाका जवळ एक पिकअप गाडी संशयास्पद अवस्थेत येताना दिसली. पोलिसांनी या गाडीला बाजूला घेऊन झडती घेतली असता आत मध्ये रक्तचंदनाचा मोठा साठा सापडला. पोलिसांनी गाडीतील तिघांनाही ताब्यात घेऊन अटक केली.