पुण्यात जोडप्याचा भर रस्त्यात रोमान्स
पुण्यातील वातावरण आता बदलू लागले आहे. पुण्यातून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. भररस्त्यात पुण्यात जोडप्याचा रोमान्स सुरु होता. हा सर्व प्रकार पाहून रस्त्यावरील वाहतूक थांबलेले असून वाहतूक कोंडी झाली होती. एवढेच नाही तर वाहतूक पोलीस आणि रस्त्यावरील लोकांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तरीही ते एकमेकांना आलिंगन करण्यात गुंतलेले होते. ते बेभान होऊन एकमेकांच्या मिठीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
भररस्त्यात दोघे बिनधास्त रोमान्स करत आहे. एकाद्या चित्रपटाप्रमाणे हे तरुण जोडपे भररस्त्यात एकमेकांच्या मिठीत होते त्यांना आपण कुठे आहोत ह्याचे देखील भान नव्हते .नंतर ते दोघे निघून जातात. व्हिडीओ मधील हा सर्व प्रकार पाहून पुण्यातील लोक आणि नेटकरी संताप करत आहे.
Edited By - Priya Dixit