गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (20:28 IST)

प्रेम संबंधाच्या करणावरून तरुणाचा निर्घृण खून, पुण्यातील घटना

murder
पुण्याच्या देहूरोड भागात एका तरुणाचा प्रेम संबंधावरून निर्घृण खून करण्याची घटना घडली आहे. तरुणाचे आरोपींच्या बहिणीशी प्रेम संबंध होते हे तरुणीच्या भावांना कळल्यावर त्यांनी तरुणाचा खदानीत ढकलून खून केला.  

सदर घटना शुक्रवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास देहूरोडच्या ट्राय जेसूस चर्चच्या पाठीमागे डोंगऱ्याचा पायथ्याशी घडली आहे.अजय जोगिंदर लुक्कड असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांना देहूरोडच्या ट्राय जेसूस चर्चच्या पाठीमागे डोंगऱ्याचा पायथ्याशी खदानी मध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले त्यांना तरुणाचा मुतदेह आढळला.पोलिसांनी प्रकरणाचा तपास केल्यावर तीन संशयितांना ताब्यात घेतले.

मयत अजयचे एका तरुणीशी प्रेम संबंध होते. हे तरुणीच्या भावांना समजल्यावर त्यांनी अजय ला देहूरोड पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या खदानी जवळ बोलावले आणि त्याला खदानीत ढकलून दिले. त्यामुळे अजयचा जागीच मृत्यू झाला.
Edited By - Priya Dixit