शुक्रवार, 12 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (18:18 IST)

पुण्यात दोन गटात हाणामारी, कोयत्याने सपासप वार केले

The thrill of 'Mulshi Pattern'  पुण्यात 'मुळशी पॅटर्न' चा थरार in Pune Clash between two groups in Pune  Kranti Chowk of Budhwar Peth  Pune Crime News In Marathi Maharashtra Batmya Maharashtra News In Marathi
पुण्यात 'मुळशी पॅटर्न' चा थरार झाला असून पुण्यात बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. दोन गटातील हाणामारी केल्याची घटना बुधवार पेठेच्या क्रांती चौकात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून अद्याप घटनेची नोंद पोलिसात झालेली नाही. 
 
रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली असून सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोन गट अमोरसमोर आले असून त्यांच्यात हाणामारी होत आहे. त्यात एका तरुणाच्या  हातात कोयता असून तो काहींवर सपासप वार करत आहे. लोंकाची गर्दी दिसत असून घडलेल्या प्रकारामुळे लोकांचा गोंधळ उडाला आहे. आपला जीव वाचविण्यासाठी लोकांची पळापळ सुरु आहे. अद्याप या घटनेची नोंद पोलिसात झालेली नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उदभवला आहे. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. 
 
Edited by - Priya dixit