मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (07:48 IST)

पोलीस आयुक्तांची दणकेबाज कारवाई; शहरातील दोन कुंटणखाने ‘सील’

पुण्यात पोलीस आयुक्तांच्या दणकेबाज कारवाईने गुन्हेगार अन् अवैध धंदेवाल्यांची पळताभुई झाली आहे. आता कुंटण खान्यावर कारवाईला सुरुवात केली असून, कोरेगाव पार्क आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन कुंटण खाने सील करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.
 
कोरेगाव पार्क येथील जी रेसिडन्सी लॉज व फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार पेठ भागातील महामुनीवाडा अशी सील केलेल्या कुंठण खान्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या दोन ठिकाणी छापे टाकत येथील वेश्या व्यवसाय उघडकीस आणला होता. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने दोन्ही कुंटण खाने सील करावेत म्हणून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
 
त्यानुसार अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलीस आयुक्तांना जिल्हा दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी हे दोन्ही कुंटण खाने सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कुंटण खाने सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे.