रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (16:01 IST)

कोयत्याने केक कापणे महागात पडले, बर्थडे बॉय सह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

सध्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरुणांना काही हटके करण्याचा नाद लागला आहे. काही हटके करणे एका बर्थडे बॉयला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने आपल्या बर्थडेचा केक कोयत्याने कापला .हा प्रकार घडला आहे पुण्यातील दापोडी येथे. कोयत्याने केक कापण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आणि त्याच्या मित्रांवर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा मुख्य आरोपी फरार झाला असून मित्राला अटक करण्यात आली आहे. समीर सियाज बागसिराज वय वर्ष 20 राहणार दापोडी असे या अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी सोहेल शेख फरार आहे. आता भोसरी पोलीस बर्थडे बॉय ला  शोधत आहे. 
 
सोहेलचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्या मित्राने समीरने पार्टीचे आयोजन केले होते. रात्री १२ वाजेच्या सुमारास समीरने कोयत्याने केक कापला आणि वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहे.