1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (23:40 IST)

डॉ. प्रकाश बाबा आमटेंना यांना रक्तातील कर्क रोगाचे निदान,पुण्यातील रुग्णालयात दाखल

महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्लड कॅन्सरचे निदान झाले आहे. त्यांची पुढील तपासणी सुरु असल्याची माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली.
 
कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, आमटे यांनी पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली तेव्हा त्यांना खोकला आणि ताप आला होता.त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
 
हेमलकसाच्या जंगलात आदिवासी आणि वन्यप्राण्यांच्या सेवेत रमलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेत समर्पित केलं आहे. आदिवासींना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी. त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. यासाठी हेमलकसाच्या 'लोकबिरादरी प्रकल्पातूवर ' ते आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाताई आपटे कार्यरत आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून ते दोघे आदिवासींना सेवा देण्याचे कार्य करत आहे. 
 
सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’  हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना देण्यात आला आहे. जंगली प्राणी आणि माणसाचं नातं जपणारे अनाथालय 'आमटे आर्क' हे प्रसिद्ध आहे.सध्या त्यांची प्रकृती बरी नसून त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांच्या पुढील तपासण्या सुरु आहे.