बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (16:07 IST)

महिला पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यात पोलीस दलातील गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली .आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. शिल्पा चव्हाण असे या मयत महिला पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. आत्महत्येचे  कारण अद्याप समजू शकले नाही. 
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा चव्हाण या शहर पोलीस दलात कार्यरत असून त्यांच्या कडे सामाजिक सुरक्षा विभाग आणि एमओबी या दोन ब्रँचचा पदभार होता.त्यांच्या धाडसी कारवाईमुळे त्या नेहमी चर्चेत असायचा.  
आज सकाळी कार्यालयातील कर्मचारी त्यांना आणण्यासाठी घरी गेला असता त्यांनी दार उघडले नाही. बऱ्याच वेळा फोन केल्यावर देखील त्यांनी फोन घेतला नाही. दार तोडून बघितल्यावर त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. 
घटनेची माहिती मिळतातच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून  त्यांनी आत्महत्येचे प्रकरण नोंदवून घेतले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.  या घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. त्यांना एक मुलगा असून तो गावी गेल्याचे समजले आहे.