गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (11:57 IST)

पुणे येथे भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू

पुण्यातील नवले पुला जवळ भीषण अपघात होऊन या अपघातात तिघांचा मृत्यू झाला .उतारावर कंटेनर मागे सरकत असताना मागून येणाऱ्या वाहनांची धडक बसल्याने हा अपघात झाला.
साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि हा कंटेनर उताराच्या दिशेने मागे सरकत गेला. या कंटेनरची धडक लागून अन्य वाहनांचा अपघात झाला. या मध्ये काही दुचाकी तर काही चार चाकी वाहने आहेत. 
पुणे सातारा महामार्गावर हा अपघात सकाळी सव्वा नऊ वाजता झाला. या अपघातात गाडीची वाट बघत उभे असलेले तिघे या कंटेनरच्या खाली चिरडले गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला.