बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (10:43 IST)

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर गंभीर अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या एका अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. मळवली ते ताजे या गावांच्या दरम्यान मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात प्रकाश घोडके आणि राजमती गाडेकर हे ठार झाले तर शालन घोडके गंभीर जखमी आहेत.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना ताजे गावच्या हद्दीत टायर फुटल्यामुळं भरधाव वेगात कार महामार्गावर तीन ते चार वेळा पलटली, अशी माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे.
कारमधील जखमीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही काळ या महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. अपघातग्रस्त कार बाजूला करून मार्ग मोकळा करण्यात आला.