शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (15:55 IST)

नगर सेवकाच्या मुलाने विवाहितेवर बलात्कार केला, गुन्हा दाखल

या महिलेने आरोपीच्या विरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर बंडू तात्या गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे.  
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही भाजी विकण्याचे व्यवसाय करते. भाजी घेण्याच्या निमित्ताने आरोपी महिलेकडे ये जा करत असायचा. दीड वर्षांपूर्वी महिला घरात एकटी असताना तिच्यावर बलात्कार केला. महिलेने विरोध केला असताना त्याने तिला पतीला आणि मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर वाईट होईल. 
नंतर आरोपीने पुन्हा 17 डिसेंबर रोजी महिलेवर अति प्रसंग करताना महिलेच्या पती आणि मुलाने बघितले असता त्याने दोघांना ठार मारण्याची धमकी दिली. नंतर फिर्यादीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार केलीअसून  पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहे.