शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (23:42 IST)

नवीन जिंदाल यांच्याविरुद्ध पुण्यात एफआयआर

फोटो साभार-सोशल मीडिया प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचे निष्कासित नेते नवीन कुमार जिंदाल यांच्याविरुद्ध पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात आयपीसीच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 
 
कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील म्हणाले, "भाजप नेते नवीन कुमार जिंदाल यांच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात आयपीसीच्या विविध कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे." 
 
दरम्यान, सोशल मीडियावर पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट केल्याचा निषेध पुणे नाशिक शहरातील लोकांनी केला. प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल कथित अवमानकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत शहरातील मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाच्या लोकांनी शनिवारी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले. 
 
इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रेषित मुहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट टाकण्यात आली होती. ही पोस्ट व्हायरल होताच जुने नाशिक, वडाळागाव आदी भागातून जमलेल्या लोकांनी भद्रकाली पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. या कृत्याला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत लोकांनी घोषणाबाजी केली. 
 
पोलिस आयुक्त जयंत नायकनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना शांत केले. सायबर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता (IPC)कलम 153 (दंगल घडवण्यासाठी प्रवृत्त करणे) आणि इतर आरोपांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.