शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (08:16 IST)

पुण्यात भाजपच्या बॅनर्सवरून माजी महापौरच गायब!

Pune Mayor Murlidhar Mohol
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात अनेक ठिकाणी बॅनर्स  पाहायला मिळत आहे. शहर भाजपच्या वतीने शहरातील विविध जागांवर मोठे बॅनर्स उभारण्यात आले होते. मात्र यात पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ  यांचाच फोटो गायब आहे. शहरातील विविध भाजप नेत्यांचे फोटो असताना महापौर राहिलेले मोहोळ यांचा फोटो का लावला नाही अशा चर्चां आता रंगू लागल्या आहेत.
 
10 जूनला भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच कोथरूडच्या आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी भाजपातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छांचे बॅनर्स लावले. या बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांचे फोटो आणि नावे दिसली. मात्र पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांचा फोटो सोडाच पण नावाचा देखील उल्लेख कुठल्याही बॅनर्स वर दिसला नाही. माजी महापौरांचाच फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला यामुळे भाजपमध्ये कुठला अंतर्गत वाद आहे का प्रश्न देखील उपस्थित होत आहे.