शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (16:59 IST)

सलग चौथ्या दिवशी पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोनामुक्त नागरिकांची संख्या अधिक !

पुणे महानगरपालिका हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज 4539 इतके नवे रुग्ण तर 4851 कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आहे.
 
पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 लाख 87 हजार 030 इतकी झाली आहे, तर एकूण डिस्चार्ज संख्या 3 लाख 29 हजार 148 झाली आहे. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 51552 वर पोहोचली आहे.शहरात उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 1313 रुग्ण गंभीर तर 6211 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. आज एकाच दिवसात 22 हजार 277 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 19 लाख 68 हजार 514 इतकी झाली आहे.
 
महापालिका हद्दीत नव्याने 56 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची तसेच पुण्याबाहेरील 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 6 हजार 330 इतकी झाली आहे.तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.