सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (15:42 IST)

पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार , 6 जणांना अटक

rape
पुण्यात चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत 6 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पीडित मुलीवर चाकूचा धाक धावून अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यामुळे पुणे हादरले आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाही आरोपींना अटक केली आहे. 
 
जय राजू तिंबोळे, ओम राजू तिंबोळे, किरण जावळे, शुभम सुनील जाधव, आणि अनिल जाधव,अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा संपूर्ण प्रकार जुलै ते डिसेंबर 2022 या कालावधीत घडल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले. 
 
प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल जाधव याने चाकूचा धाक दाखवून पीडितेच्या अपहरण करून तिला एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे नग्नावस्थेतील फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. य प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
Edited By - Priya Dixit