गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 25 सप्टेंबर 2022 (16:29 IST)

पुण्यात मनसेचं 'पाकिस्तान जिंदाबाद'विरोधात 'हर हर महादेव' आंदोलन

maharashatra navnirman sena
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या नेत्यांची देशात धरपकड सुरु झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी त्याचा निषेध व्यक्त केला होता. काल पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रीय तपास एजन्सीने पुण्यासह देशभरात पीएफआय संघटनेवरील छापेमारीच्या विरोधात आंदोलन केलं.या वेळी पाकिस्तान जिंदाबाद आणि अल्लाह हू अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आली.

यादरम्यान, PFIच्या समर्थकांनी आज पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर सर्व राजकीय पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. यावर माणसे चांगलीच आक्रमक झाली असून यासंदर्भात राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद'चा विरोध करत हर हर महादेवची जोरदार घोषणाबाजी केली.
 
पुण्याच्या अलका चौकात आज (25 सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास मनसे कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी पुण्यातील 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणाबाजीचा निषेध केला.
दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी यावेळी पोलिसांचा बंदोबस्त अलका चौक परिसरात तैनात करण्यात आला होता.
पाकिस्तान झिंदाबाद घोषणेच्या प्रकारावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्वीट करून प्रतिक्रिया दिली.
 
ते म्हणतात, "NIA ने छापे घातले आणि PFI च्या अधिकाऱ्यांना अटक केली म्हणून पुण्यात या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी अल्लाहू अकबर, पाकिस्तान जिंदाबाद शा घोषणा दिल्या. सरकारने त्यांना वेळीट ठेचलं पाहिजे.
 
ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणं, त्यांचं प्रशिक्षण भरवणं या गंभीर आरोपांखाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत.

माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त या देशद्रोह्यांना नव्हे तर त्यांच्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील पा उच्चारता येणार नाही.
 
नाहीतर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी आवळल्या तर यांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल.त्यापेक्षा ही कीड समूळ नष्ट करा, यातच हिंदुस्थानाचं हित आहे."
मनसेने माहिती दिली होती की जर इस्लामिक तत्ववादी 'पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असतील तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार,देशाचे रक्षण करण्यासाठी हर हर महादेव च्या घोषणा देऊन निर्दशन करणार असं जाहीर केलं होत.