शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (20:35 IST)

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रीय तपास एजन्सीने पुण्यासह देशभरात पीएफआय संघटनेवरील छापेमारीच्या विरोधात आंदोलन केलं.या वेळी पाकिस्तान जिंदाबाद आणि अल्लाह हू अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा करणाऱ्या पीएफआय च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पीएफआयचे कार्यकर्ता  रियाझ सय्यद सह एकूण 60 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

या प्रकरणात भाजप नेत्यांनी ट्विट करून पीएफआय च्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत भाजप नेत्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
आमदार राम सातपुते यांनी पुणे पोलिस, राज्याचे पोलिस महासंचालक आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले की, ‘पुण्यात पीएफआयच्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणा-या पिलावळीला पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल करावेत.