शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (20:55 IST)

चांदणी चौकातील 'तो' पूल २ ऑक्टोबरला मध्यरात्री पाडण्यात येणार

पुण्यातल्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथील पूल पाडला जाणार आहे. हा पूल नोयडा येथील ट्विन टॉवर पाडणारी कंपनी पाडणार आहे. हा पूल आधी 18 सप्टेंबरला पाडला जाणार होता. मात्र, काही कारणामुळे हा पूल पाडला नाही. सध्या या पूलात स्फोटके भरण्याचे काम सुरू आहे. पूलाच्या आजू बाजूच्या टेकड्या फोडण्याचे काम सुरू आहे. हा पूल नियंत्री स्फोटकाद्वारे पाडला जाणार आहे. पूल पाडल्यानंतर पर्यायी वाहतुकीसाठी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्याने पूल पाडण्याची तारीख निश्चित करण्यात आली असून २ ऑक्टोबरला मध्यरात्री हा पूल पाडण्यात येणार आहे.
 
पुण्याच्या चांदणी चौकातील वाहतूककोंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडकले होते. यावेळी काही नागरिकांनी त्यांना वाहतूक कोंडीतून सामान्य नागरिकांची सुटका करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली होती. यानंतर हा पूल पाडण्याचे ठरवण्यात आले होते. कंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हा पूल पाडण्यासाठी मंजूरी दिली होती. हे पूल पाडण्याचे काम पाईपलाईन वळवण्याच्या कामामुळे आणि पावसामुळे पुडे ढकलण्यात आले होते. 
 
नियंत्रीत स्फोटकांच्या साह्याने हा पूल पाडला जाणार असून स्फोटके पुण्यात आणण्यात आली आहे. नो हा पूल १० सेकंदात पाडण्यात येणार आहे. पूल पडल्या नंतर जो राडारोडा तयार होणार आहे, तो हटवण्यासाठी 8 ते 10 तास लागणार आहेत. यासाठी या मार्गावरची वाहतूक ही वळवण्यात आली आहे.