शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (23:00 IST)

यामुळे पुणे पालिकेचा हेल्पलाईन नंबर लागत होता सतत व्यस्त…

पुणे शहर कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत. यामुळे कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने दिलेल्या 24 तास हेल्पलाइन नंबर जारी केला होता मात्र तो सतत व्यस्त असल्याच्या तक्रारी येत होत्या.आता पालिकेने नागरिकांनी केवळ 020-5502110 या एकाच क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. कॉल गेल्यानंतर तो अन्य कॉलवर म्हणजे लाइन्सवर जाऊन तो अन्य दहा नंबरवर असलेल्या हेल्परकडे वर्ग होतो, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
 
या आधी महापालिकेने येथील सगळ्या हेल्पलाइनचे नंबर जाहीर केले होते. त्यामुळे सगळेच नंबर व्यस्त लागत होते. त्यामुळे 10 हेल्पलाइन नंबर असूनही उपयोग नाही अशा तक्रारी महापालिकेकडे येत होत्या. महापालिकेच्या तंत्रज्ञांना याविषयी विचारले असता, वरील वस्तुस्थिती समोर आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
 
एकाच नंबरवर कॉल लावल्यास तो अन्य नंबरवर वर्ग करण्याची सिस्टिम यामध्ये बसवण्यात आली आहे. पूर्वी जाहीर केलेल्या प्रत्येक नंबरवर वैयक्तिक कॉल केल्यास तो व्यग्रच लागतो, असे पाहणी दरम्यान लक्षात आले आहे.
 
त्यामुळे नागरिकांनी आता केवळ 020-25502110 या क्रमांकावरच संपर्क करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.हेल्पलाइनमध्ये कॉल घेण्यासाठी मनुष्यबळ कमी आहे; त्याचाही परिणाम नागरिकांचे कॉल अटेंड करण्यावर होत आहे. त्यामुळे टेलिफोनिक कॉल सेंटर येथे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माहिती तंत्रज्ञान प्रमुख राहुल जगताप यांनी आरोग्यप्रमुखांकडे केली आहे.