शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (07:52 IST)

पुणेकरांना दिलासा! कोरोनासंदर्भात असे आहेत नवे नियम : आयुक्त सौरभ राव

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच प्रशासनानं पुणेकरांवर कुठलेही नवे निर्बंध न लादण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर आणि आरोग्य व्यवस्था सुधारणेवर भर देण्याचा निर्णय घेतला. कोरोना संसर्ग सर्वाधिक वेगानं वाढत असल्यानं लसीकरणात पुण्याला प्राधान्य मिळावं, अशी मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली.
 
आरोग्य विषयातील तज्ज्ञांनीही पुण्यातील 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण दिल्यास दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत होईल, असा सल्ला दिल्याचं राव यांनी सांगितलं. पुण्यातील कोरोना स्थितीविषयी सकाळी पालकमंत्री अजित पवार, मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत काऊन्सिल हॉल येथे बैठक झाली. त्यानंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेतली.
 
काय आहे नवीन नियम?
पुण्यातील शाळा – महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यातून सूट
हॉटेल्स दहा वाजेपर्यंत सुरु राहतील. तर होम डिलीव्हरी 11 वाजेपर्यंत करता येईल.
त्याचबरोबर एकुण आसनक्षमतेच्या पन्नास टक्केच लोकांना परवनगी
लग्न समारंभ , धार्मिक विधी, कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम , अंत्यविधीप्रसंगी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त पन्नास लोकांना परवानगी
नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाईपुण्यातील बागा फक्त सकाळी सुरू राहतील तर संध्याकाळी बंद
रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार नियंत्रण
एमपीएससीचे कोचिंग क्लासेस आणि लायब्ररीच्या पन्नास टक्के क्षमतेनुसार विद्यार्थांना वापरता येणार
थिएटर, मॉल्स आणि दुकानं दहा वाजेपर्यंत सुरु राहतील.