बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (08:17 IST)

आता बोला, ह्युंदाई शोरूमच्या गाड्या परस्पर विकून लाखोंची फसवणूक

सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या कामगारांनीच ह्युंदाई शोरूमला  गंडा घातला असून ग्राहकांच्या नावाने पर्चेस ऑर्डर करून 52 लाख 96 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसानी गुन्हा  दाखल केला आहे.
 
सनी चंद्रप्रकाश गर्ग  (रा. पिंपळे सौदागर), शिवराज लहू पवार (रा. टिंगरेनगर), दिपराज सिंग ऊर्फ सरदारजी (रा. नांदेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ज्योती अलेक्स डिमेलो (वय 30, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथे सचिन मित्तल यांचे क्रिशा ऑटोमोटिव्ह नावाचे शोरूम आहे. या शो रूममध्ये ज्योती डिमेलो या जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. आरोपी सनी आणि शिवराज हे दोघे या शोरूममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करीत होते. तर, दिपराज हा सीएसडी एजंट म्हणून काम करीत होता. आरोपींनी पाच कारच्या डिलिव्हरीची बनावट पर्चेस ऑर्डर तयार केली. जयदीप दावडा, सचिनकुमार सिंग, आकाश सक्सेना, अनिल गुप्ता यांच्या नावाने ही बनावट पर्चेस ऑर्डर तयार केली. कंपनीची दिशाभूल करून 52 लाख 96 हजार रुपायांची फसवणूक  केली.