सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (17:37 IST)

पिंपरीत शिवसैनिकांनी भाजपच्या किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी पिंपरी येथील भाजपच्या पक्ष कार्यालयास भेट दिली. नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर आरोप केले .सोमय्या हे पिंपरीला येत असल्याची माहिती शिवसेनिकांना लागल्यावर मोठ्या संख्येने शैवसिनिक मोरवाडी येथील भाजप कार्यालय जवळ जमा झाले. आणि  किरीट सोमया यांनी महापालिकेतील स्मार्टसिटी कंपनीतील घोटाळा भाजपच्या भ्रष्टाचाऱ्यांची ईडी ,आयकर विभागाकडून चौकशी केली जाण्याची  मागणी करून निवेदन दिले   
सोमयानी निवेदनास नकार दिल्यावर संतप्त शिवसैनिक कार्यकर्त्यानी काळे  झेंडे दाखवत 'किरीट सोमय्या हाय  हाय ' शिवसेना जिंदाबाद 'अशी घोषणा  सुरु केली याला प्रत्युत्तर  म्हणून भाजप च्या कार्यकर्त्यांनी देखील 'भारत माता की जय' किरीट सोमय्या जिंदाबाद ' अशा घोषणा दिल्या. या आंदोलनाची कुणकुण पोलिसांना आधीच लागली होती म्हणून त्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या मदतीसाठी राखीव पोलीस दलाचे जवान ही तैनात करण्यात आले होते