गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:10 IST)

कब्रस्तानात प्रेमीयुगुलाचं सुरू होतं ‘गुलूगुलू’, पुढं झालं असं काही…

पुणे : दापोडी परिसरात असलेल्या कब्रस्तानामध्ये एक प्रेमीयुगुल गप्पा मारत बसले होते. त्यावेळी या जोडप्याला हटकल्याने तरुणाने आणि त्याच्या साथिदारांनी सुरक्षारक्षकाला (security guard) बेदम मारहाण (beat) केली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.10) दुपारी घडली. या घटनेत सुरक्षारक्षक आझम खान (रा. दापोडी) हे जखमी झाले आहेत.
 
दापोडी येथील कब्रस्तानात एक प्रेमी युगुल दुपारी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना हटकले. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने त्यांना तिथून हाकलून दिले. त्यावेळी ते दोघे तेथून निघून गेले. मात्र, हकलून दिल्याचा राग तरुणाच्या मनात होता. काही वेळाने तरुण आपल्या इतर तीन साथिदारांना घेऊन कब्रस्तानात आला. त्यांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली.
 
आझम खान यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझम खान हे कब्रस्तानात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. बुधवारी दुपारी एक तरुण आणि तरुणी कब्रस्तानमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी खान यांनी त्याना हटकले आणि तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर ते दोघे तेथून निघून गेले. काही वेळाने तो तरुण आपल्या इतर तीन साथिदारांना घेऊन आला. त्या चौघांनी खान यांना दमदाटी करत धमकावले. तसेच लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण (Pune Crime) केली. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.