शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (15:41 IST)

सुरुवातीला प्रवासी वर्गाला भीती वाटू नये म्हणून चालकासह मेट्रो धावणार

पुण्यात मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे लवकर पुणेकरांच्या सेवेस मेट्रो  दाखल होणार आहे. पुणे मेट्रो ही स्वयंचलित असून सुरुवातीला प्रवासी वर्गाला भीती वाटू नये म्हणून चालकासह मेट्रो  धावणार आहे. त्यानंतर प्रवाशांना सवय झाल्यानंतर ती विनाचालक धावणार आहे. 
 
विनाचालक मेट्रो वनाज ते रामवाडी  व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यान धावणार आहे. शिवाजीनगर येथील धान्य गोडाऊन येथे असलेल्या मेट्रोच्या टर्मिनलमध्ये या मार्गाचे नियंत्रण असणार आहे. मेट्रोच्या आत आणि स्थानकातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष शिवाजीनगरला असणार आहे. त्यामुळे येथून मेट्रोवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. मेट्रो मार्ग तयार झाल्यानंतर अवघ्या ६० सेकंदात मेट्रोची सेवा उपलब्ध होणार आहे. लक्ष्मी रस्त्यावर  खरेदी, बालगंधर्वला नाटक, आयनॉक्स किंवा ई-स्क्वेअरला सिनेमा असो की दगडूशेठ गणपतीचे दर्शन मेट्रोच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुणेकरांना या ठिकाणी आल्यानंतर वाहनतळ शोधण्याची गरज भासणार नाही. वातानुकूलित मेट्रोचा  प्रवास करत इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे.