बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (13:20 IST)

राज्यात मास्क लावणे अनिवार्यच आहे - अजित पवार

मंत्रिमंडळात मास्क बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मास्कच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते.
 
अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्व कायम मास्क लावण्याच्या मताचे आहोत. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे मास्क लावणे बंधनकारक आहे. राज्यात मास्कवर बंदी काढण्याच्या बातम्या खोट्या असल्याचे ते म्हणाले. 
 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला टाळण्यासाठी मास्कचा वापर करायलाच पाहिजे. महाराष्ट्र आता लवकरच मास्क मुक्त होणार, राज्याचे मुख्यमंत्री यावर लवकरच निर्णय घेणार अशा बातम्या चुकीच्या आणि खोट्या आहेत. मास्क काढण्याच्या संदर्भात अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. या सर्व अफवा आहेत. असं अजित पवार म्हणाले.