रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated :पुणे , शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (16:38 IST)

गुंगीचं औषध देऊन युवतीवर केला बलात्कार

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अक्षय कदम नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे त्यानी आपल्या मैत्रिणीला ज्यूसमधून  गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला आपल्या फ्लॅटवर नेले तेथे त्यानी तिला ज्यूसमधून गुंगीचं औषध दिलं होतं. यानंतर गुंगी आलेल्या युवतीवर आरोपीनं बलात्कार केला. व बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील शूट केला आहे. याप्रकरणी या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 
अक्षय कदम असं गुन्हा दाखल झालेल्य आरोपी तरुणाचं नाव असून तो पुण्यातील आंबेगाव परिसरातील रहिवासी आहे.