1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (09:44 IST)

मिस पिंपरी चिंचवड विशाखाची आत्महत्या

Miss Pimpri Chinchwad Visakha Sonkamble suicide
मिस पिंपरी-चिंचवड स्पर्धेच्या मानकरी ठरलेल्या विशाखा दीपक सोनकांबळे यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सांगवी भागातील मधुबन सोसायटी मधील राहत्या घरात विशाखा सोनकांबळे यांनी आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशाखा यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. 
 
विशाखा सोनकांबळे ह्या योगा प्रशिक्षक देखील होत्या, तसेच त्या मिस पिंपरी -चिंचवड स्पर्धेच्या मानकरी देखील ठरल्या होत्या. विशाखा आपल्या पती दीपक सोनकांबळे आणि दोन मुलांसह मधूबन सोसायटीमध्ये राहत होत्या. रविवारी रात्री विशाखाचे पती आपल्या मुलांसोबत घेऊन हॉलमध्ये झोपले होते आणि विशाखा आतमध्ये रूममध्ये झोपून होती. त्या दरम्यान विशाखाने अगोदर हाताची नस कापली नंतर गळफास घेतला आहे. 
 
विशाखाने आत्महत्या का केली हे अजून मात्र समजू शकल नाही. मात्र सांगवी पोलिसांनी विशाखा सोनकांबळे आत्महत्या संदर्भात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.