शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (08:24 IST)

अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्या, दोन आरोपींना अटक

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्यात करण्यात आल्याचे समोर आले आहे. तिच्यावर कोयत्याने वार करून तीन जणांनी निर्घृण हत्या केली आहे. माहितीनुसार याप्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्याचा अजूनही शोध सुरू आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
पुण्यातील १४ वर्षी ही मुलगी स्थानिक संघामध्ये कबड्डीपटू होती. मंगळवारी ती कबड्डीचा सराव करण्यासाठी बिबवेवाडीतील यश लाँच येथे गेली होती. तिथे तीन जणांनी तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. ज्यामध्ये दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. ही मुलगी आठवीत शिकणारी होती. याप्रकरणातील तीन आरोपींपैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अजून तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणातील आरोपींची प्रथमदर्शनी ओळख पटलेली आहे. यामधील मुख्य आरोपीचे नाव ऋषीकेश भागवत असे आहे. आरोपी ऋषीकेश भागवत हा तिच्या नात्यातील असून तो मुलीचा चुलत मावस भाऊ लागतो, अशी माहिती समोर आली आहे.